महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ
सरळसेवा भरती प्रक्रिया
सूचना
 
कृपया प्रत्येक सूचना वाचून नोंदणीला जा.

सूचना

महा-एस.टी. ऑनलाईन आवेदनपत्र भरण्यासाठीच्या सूचना खाली नमूद केल्याप्रमाणे

महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ  सरळसेवा भरती प्रक्रियेसाठी सात प्रमुख़ टप्पे आहेत.

1.  प्राथमिक महिती नोंदवणे

2.  फोटो व स्वाक्षरी अपलोड करणे.

3.  पद,  शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अर्हता नोंदवणे

4.  खात्री (Confirm) करणे.

5.  बँक चलन प्रिं करणे

6. स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाख़ेत शुल्क भरुन Transaction Id मिळवणे.

7. Transaction Id mahast.in वेबसाईट वर नोंदवणे आणि अर्जाची प्रत प्रिंट करणे

 

प्राथमिक महिती नोंदवणे

प्राथमिक महिती  नोंदवीण्यासाठी या पृष्ठच्या तळाशी असलेले “नोंदणीला जा” हे बटण क्लिक् कर. प्राथमिक महिती  नोंदणीच्या पृष्ठावर सर्व महिती इंग्लिश कॅपिटल लेटर्स मध्ये भरा. या पृष्ठावर आपण संपुर्ण नाव, जन्मदिनांक, लिंग, वैवाहिक स्थिती, कायमचा व पत्रव्यवहाराचा पूर्ण पत्ता, मोबाईल क्रमांक, ईमेल आयडी, जातीचा प्रवर्ग, समांतर आरक्षण प्रकार इत्यादी माहिती भरावी लगेल. सर्व अनिवर्य महिती भरल्यानंतर सेव(Save)  बटण क्लिक् करा.

अर्जदाराने नोंद केलेल्या मोबाईल व इ-मेल आयडी वर, नोंदणीक्रमांक व पासवर्डचा मेसेज लगेचच येईल व आपणाला अर्जदाराच्या मुख्य पृष्ठावर नेले जाईल.

 

फोटो आणि स्वाक्षरी अपलोड करणे.

या टप्प्यासाठी अर्जदाराचा सध्याचा फोटो व स्वाक्षरीची इमेज उपलब्ध असणे आवश्यक आहे.

कार्यपध्दती-

हा टप्पा सुरु करण्यासाठी, अर्जदाराच्या मुख्य पृष्ठावरील “Upload Photo and Sign”  या लिंक वर क्लिक करावे.

3.5 से.मी X 4.5, 200 डी.पी.आय. चा रंगीत फोटो स्कॅन करावा. स्कॅन इमेज फोटोबॉर्डरपर्यंत  क्रॉप करण्यात यावी. सदर इमेज 5 के.बी ते 100 के.बी या आकारामध्येच बसेल याची खात्री करुन घ्यावी. इमेज जेपीजी फाईल मध्ये असणे आवश्यक आहे.

 

      4.5 से.मी X 2 से.मी. चा चौकोन पांढ-या कागदावर आखावा. त्यामध्ये काळ्या शाईच्या पेनने स्पष्ट स्वाक्षरी करावी. सदरची स्वाक्षरी असलेले पृष्ठ 200 डीपीआय मध्ये स्कॅन करावे व क्रॉप करावे. स्वाक्षरीची इमेज 2 के.बी ते 50 के.बी या आकाराची असेल याची खात्री करा. स्वाक्षरीची इमेज जेपीजी फाईलमध्ये असणे आवश्यक आहे.

फोटो व स्वाक्षरी अपलोड करण्यासाठी तत्सम ब्राउस (Browse) बटण क्लिक करुन फाईल निवडवी. अप्लोअड बटण क्लिक केल्यानंतर फोटो व स्वाक्षरी या पृष्ठावर दिसेल.

 

पद,  शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अर्हता नोंदवणे

या टप्प्यासाठी अर्जदाराला आपण अर्ज करावयची पद निवडवे लागतील शैक्षणिक पात्रता आणि व्यावसायिक अर्हता नोंदवावी लगेल.

हा टप्पा सुरु करण्यासाठी, अर्जदाराच्या मुख्य पृष्ठावरील “Post and Qualification  या लिंक वर क्लिक करावे.  पृष्ठावरील डाव्यबाजुला पदांची यादी दिसेल. अर्ज करवयाची पदं निवडल्यावर पृष्ठावरील उजव्याबाजुला शैक्षणिक अर्हता, अनुभव व ईतर आवश्यक महिती भरण्यचे रखाणे दिसतील. आपली संपुर्ण माहिती भरा व सवे (Save) बटन वर क्लिक करा. आपण निवडलेल्य पदांना, आपण भरलेल्या माहिती प्रमाणे, आपण पत्र असल तर, पुढील टप्यात जाण्यासाठी “Confirm” कार्यान्वित होईल

 

खात्री (Confirm) करणे.

एकदा हा टप्पा पुर्ण केल्यावर, अर्जावरील कोणती माहिती बदलता येणार नाही. हा टप्पा पुर्ण करण्यापुर्वी आपण आपली माहितीची खात्री करुन घ्यवी. त्यासाठी, अर्जदाराच्या मुख्य पृष्ठावरील “Edit” ,Upload Photo and Sign” व “Post and Qualification या लिंक्स चा वापरकरावा व अवश्यक असल्यास बदल करावा. खात्री झाल्यवर “Post and Qualification पृष्ठावर जाउन  “Confirm” बटन वर क्लिक करावे.

खात्री (Confirm) च्या पृष्ठावरील प्रतिज्ञापत्रा वचून ते वचल्या असल्याचा चेक बॉक्स टिक करवा व या पृष्ठावरील “Confirm” बटन वर क्लिक करावे.

बँक चलन प्रिं करणे

बँक चलन प्रिं करण्या आधी “खात्री (Confirm)” चा टप्पा पुर्ण करणे अवश्यक राहील. बँक चलन प्रिं करण्यासाठी अर्जदाराच्या मुख्य पृष्ठावरील “Print Challan” या लिंकवर क्लिक करावे व आपले बँक चलन, A4 कागदावर प्रिं करावे.

 

स्टेट बँक ऑफ इंडियाच्या शाख़ेत शुल्क भरुन Transaction Id मिळवणे.

वर नमूद करण्यात आलेल्या चलन प्रतीचा उपयोग करुन स्टेट बँक ऑफ इंडियाच्या कोणत्याही शाखेमध्ये विहित शुल्क / फी चा भरणा करण्यात यावा. चलनावर निर्धारित केलेल्या जागेवर बँकेकडून ब्रँच कोड व ट्रन्झॅक्शन आय.डी नमूद करुन घ्यावा. शुल्क / फी जमा झाल्याची नोंद महा-एसटी कडे आल्यवर आपल्यला शुल्क / फी जमा झाल्याचा SMS व ई-मेल येईल.

 

Transaction Id mahast.in वेबसाईट वर नोंदवणे आणि अर्जाची प्रत प्रिंट करणे

शुल्क / फी जमा झाल्याचा SMS व ई-मेल मिळाल्यानंतर, अर्जदाराने mahast.in वर Login करावे. अर्जदाराच्या मुख्य पृष्ठावरील “Update Bank Challan” या लिंकवर क्लिक करुण चलनाची माहिती नोंदवावी. अर्जदाराच्या मुख्य पृष्ठावरील “Print Form” या लिंकवर क्लिक करुन अर्जाची प्रत/ अर्जांच्या प्रती प्रिंट करावी.